July 14, 2024 3:16 PM July 14, 2024 3:16 PM

views 23

Wimbledon Tennis Championship: नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराज यांच्यात आज चुरशीची लढत

विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आजचा अंतिम सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला नोव्हाक जोकोविच आणि विद्यमान विजेता, स्पेनचा कार्लोस अल्कराज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता हा सामना सुरू होईल.   अल्कराजचा हा विम्बल्डनचा दुसरा अंतिम सामना आहे, तर जोकोविचनं सात वेळा या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आठवेळा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याचं ध्येय जोकोविचसमोर आज आहे. तर मिश्र दुहेरीत सातव्या मानांकित यान...

July 14, 2024 3:10 PM July 14, 2024 3:10 PM

views 23

३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांची कमाई

कझाकस्तान इथं झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकं पटकावली आहेत.   मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण, तर रत्नागिरीचा इशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरैलीचा यशश्वी कुमार या तिघांनी रौप्यपदकाची कमाई केली.   भारतीय संघाचं नेतृत्व मुंबई टीडीएम प्रयोगशाळेचे प्राध्यापक शशिकुमार मेनन, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या डॉ. मयुरी रेगे, आयआयटी पवईचे डॉ. राजेश पाटकर आणि बडोदा एम. एस. ...

July 11, 2024 4:27 PM July 11, 2024 4:27 PM

views 8

क्रीडा पत्रकारितेसाठी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ क्रीडापत्रकार सुहास जोशी, खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंग असोसिएशननं नुकतंच जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. विलास दळवी यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अनेकदा पॉवरलिफ्टिंग खेळामध्ये पुरस्कार मिळवले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त कक्ष अधिकारी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या विजया नर यांनीही पॉवरलिफ्टिंग खेळात आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली आहेत. क्रीडा पत्रकारितेसाठी हा पुरस्कार प्रथमच देण्यात आला आहे.