November 8, 2025 12:16 PM

views 35

2028 लॉस एंजेलिस स्पर्धेत टी-20 स्वरूपात पुरुष व महिला सामने

लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028 च्या ऑलिंपिक खेळांमध्ये पुरुष आणि महिला टी-20 क्रिकेटचे सामने सहा संघांसोबत खेळले जाणार असून यामध्ये एकत्रित 28सामने होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे.   वर्ष 1900 मध्ये पॅरिसमध्ये पदार्पण केल्यानंतर ग्रेट ब्रिटनने फ्रान्सविरुद्धच्या एकाच सामन्यात सुवर्णपदक जिंकले होते. आता 128 वर्षांनी हा खेळ पुन्हा एकदा ऑलिंपिकमध्ये खेळला जाईल.

September 30, 2025 1:28 PM

views 50

GST Reforms : क्रीडा साहित्यांवर केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात क्रीडा साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया…   केंद्रसरकारने वस्तू आणि सेवा करामध्ये केलेल्या सुधारणांमध्ये खेळणी आणि क्रीडा साहित्यावरचा वस्तू आणि सेवा कर १२ टक्क्यांवरुन ५ ट्क्क्यांवर आणला आहे.  या सुधारणेमुळे ग्राहक आणि क्रीडा सहित्य विक्रेत्यांना दिलासा तर मिळेलच तसंच स्वदेशी खेळण्यांच्या उद्योगालाही चालना मिळेल. खेळण्यांवरचा जीएसटी कमी केल्यामुळे मुलांना खेळाला प्रोत्साहन मिळेल. खेळण्याचे स्वदेशी उत्पा...

August 25, 2025 3:51 PM

views 42

तिसाव्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताची दोन सुवर्णपदकांची कमाई

गुजरातमधे अहमदाबाद इथं तिसाव्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत आज पहिल्याच दिवशी भारतानं दोन सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या भारोत्तोलनात स्नॅच आणि क्लिन अँड जर्क प्रकारात ४४ ते ४८ किलो वजनी गटात प्रितीस्मिता भोईनं  एकूण दीडशे किलोग्रॅम वजन उचलत पदक पटकावलं, तर पुरुषांच्या भारोत्तोलन प्रकारात धर्मज्योती देवघरियानं एकूण २२४ किलोग्रॅम वजन उचलत पदक मिळवलं.

July 4, 2025 2:31 PM

views 14

भारतात खेळ हे कायमच राष्ट्रीय एकात्मतेचं एक सामर्थ्यशाली माध्यम असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

खेळामुळे शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना वाढते, खेळात लोक, विविध प्रदेश आणि देशांना जोडण्याची अद्वितीय शक्ती असते असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं ड्युरँड चषक २०२५ या फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचं अनावरण झालं. त्यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केलं. भारतात खेळ हे कायमच राष्ट्रीय एकात्मतेचं एक सामर्थ्यशाली माध्यम राहिलं असल्याचं त्या म्हणाल्या. फुटबॉल हा रणनीती, सहनशीलता आणि परस्पर सामाईक ध्येयासाठी सांघिक भावनेचं ...

June 29, 2025 7:18 PM

views 52

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांच्या विजेतेपदांसाठी लढती

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात आयुष शेट्टीनं जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावरचा चोऊ तिएनचेन याला २१-२३, २१-१५, २१-१४ असं हरवून अंतिम फेरी गाठली आहे. विजेतेपदासाठी आज रात्री त्याची लढत तृतीय मानांकित कॅनेडियन खेळाडू ब्रायन यांगशी होणार आहे.. महिला एकेरीत तन्वी शर्माने उपान्त्य फेरीत काल युक्रेनच्या पोलिना बुरहोवाचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. आता तिचा सामना चीनच्या बेईवेन झांग बरोबर होणार आहे. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता सुरू होईल.  

June 29, 2025 2:51 PM

views 20

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांची अंतिम फेरीत धडक

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे दोन खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले आहेत. महिला एकेरीत तन्वी शर्माने उपान्त्य फेरीत काल युक्रेनच्या पोलिना बुरहोवाचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. पोलिना बुरहोवा जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. ६६व्या स्थानावर असलेल्या तन्वीचा सामना विजेतेपदासाठी २१ व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या बेईवेन झांगशी आज होणार आहे. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता सुरू होईल. पुरुष गटात आयुष शेट्टीनं जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावरचा चोऊ तिएनचेन याला २१-...

April 2, 2025 1:39 PM

views 78

ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचे ४३ खेळाडू सहभागी

अर्जेंटिना इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचे ४३ खेळाडू सहभागी होत आहेत. या पथकाचं नेतृत्व ऑलिंपिक पदक विजेती मनु भाकर करणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज होणार आहे. या स्पर्धेत एअर रायफल, एअर पिस्तुल आणि शॉटगन प्रकार असून त्या ४५ देशांमधले ४०० हून अधिक नेमबाज सहभागी होत आहेत.   भारताच्या संघात मनु भाकरसह सौरभ चौधरी, अनिश भानवाला, विजयवीर सिद्धु, ईशा सिंग, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, सिफ्त कौर समरा, अर्जुन बबुता, पृथ्वीराज तोंडाईमन, अनंतजीत सिंग नरुका आण...

March 15, 2025 3:16 PM

views 29

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग: वेस्ट इंडिज मास्टर्सने श्रीलंका मास्टर्सचा ६ धावांनी पराभव

क्रिकेटमध्ये रायपूर इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सनी श्रीलंका मास्टर्सवर सहा धावांनी विजय मिळवला. उद्या याच मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सची लढत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालच्या इंडिया मास्टर्सबरोबर होणार आहे.

February 24, 2025 11:42 AM

views 48

नांदेडमध्ये महसूल क्रिडा स्पर्धांचा समारोप

नांदेडमध्ये महसूल क्रिडा स्पर्धांचा काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या स्पर्धेत कोकण विभागाने विजेतेपद पटकावलं. छत्रपती संभाजीनगर विभागानं दुसरा, तर पुणे विभागानं तिसरा क्रमांक पटकावला. दरवर्षी ही स्पर्धा घेण्याची आणि त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा बावनकुळे यांनी यावेळी केली.

February 23, 2025 5:06 PM

views 25

मुंबई विद्यापीठानं २६व्या क्रीडा महोत्सवात ४३० गुणांसह पटकावलं विजेतेपद

राजभवनातर्फे आयोजित २६व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठानं ४३० गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. पुरुष गटात २०० गुण आणि महिला गटात २३० गुण मिळवून मुंबई विद्यापीठानं हा बहुमान मिळवला.  गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठात १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव झाला. विविध स्पर्धा प्रकारात मुंबई विद्यापीठानं  ५ सुवर्ण ६ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली.  मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या संघानं खोखो, टेबल टेनिस, कबड्डी यात तर मुलांनी बॅडमिंटन आणि बुद्ध...