August 24, 2025 10:37 AM August 24, 2025 10:37 AM

views 6

आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

कझाकस्तान इथं सुरू अकलेल्या 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत इलावेनिल वलारिवन, शांभवी क्षीरसागर, नरेन प्रणव यांनी दुसरे सुवर्ण पदक मिळवले.   भारताने दहा मीटर नेमबाजी प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले, त्यामुळे सुवर्णपदकांची संख्या 23 वर पोहोचली असून भारताने 8 रौप्य, 10 कास्य पदकासह 41 पदके मिळवून भारताने पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. 

May 23, 2025 1:32 PM May 23, 2025 1:32 PM

views 15

ISSF ज्युनिअर वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत भारताची 1 सुवर्ण, 2 रौप्य पदकांची कमाई 

जर्मनी इथं सुरू असलेल्या  ISSF ज्युनिअर वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रियाझ धिल्लो हिनं रौप्य पदक पटकवलं. रियाझनं ६० पैकी ५१ लक्ष्यं साध्य केली. या स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूनं सुवर्णपदक तर जर्मनीच्या ॲनाबेला हिनं कांस्य पदक जिंकलं.   महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तोल प्रकारात कनक हिनं सुवर्ण तर पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात एड्रियन कर्माकर यानं रौप्य पदक मिळवलं आहे. दरम्यान, स्पर्धेत भारतानं एक सुवर्ण, दोन रौप्य पदक मिळवत पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.