August 1, 2025 12:45 PM August 1, 2025 12:45 PM
11
रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या !
रक्षाबंधन, गोकुळाष्टमी तसंच वेलंकनी यात्रेसाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. रक्षाबंधन तसंच, गोकुळाष्टमीसाठी येत्या ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. वांद्रे टर्मिनस ते सांगानेर ही गाडी ७ आणि १४ ऑगस्ट रोजी चालवली जाईल. वांद्रे टर्मिनस ते ओखा या दरम्यान १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान विशेष गाडी चालवली जाईल. वेलंकनी यात्रेसाठी २७ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान वांद्रे टर्मिनस ते तमिळनाडूतल्या वेलंकनीपर्यंत विशेष गाड्या चालवल्...