May 11, 2025 8:46 PM
18
विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची मागणी
पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तसं पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलं आहे. या मुद्यांवर व्यापक चर्चा होणं आवश्यक असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केलं आहे. भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी समाजमाध्यमांवर केली...