July 10, 2025 5:14 PM July 10, 2025 5:14 PM
16
बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरु ठेवण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला बिहारमध्ये मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण प्रक्रिया सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. न्यायचं हित लक्षात घेता, निवडणूक आयोगानं या प्रक्रिये दरम्यान आधार, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र यासारखी महत्त्वाची ओळखपत्र स्वीकारण्याचा विचार करावा असं आपलं मत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. मतदार यादीचं पुनरिक्षण करणं, ही गोष्ट संविधानाच्या कक्षेत असली, तरी ही प्रक्रिया करण्यासाठी निवडणूक आयोगानं साधलेली वेळ अनाकलनीय असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. विशेष पुनरिक्षण प्र...