August 3, 2025 12:09 PM August 3, 2025 12:09 PM
5
भारताला स्पेनकडून सोळा एअरबस सी-295 लष्करी वाहतूक विमानांचं हस्तांतरण
भारताला स्पेनकडून काल १६ एअरबस सी-२९५ लष्करी वाहतूक विमानं सोपविण्यात आली. स्पेनमधील सेव्हिल इथं भारतीय राजदूत दिनेश के. पटनायक आणि भारतीय वायु दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा हस्तांतरण सोहळा पार पडला. गुजरातमधील वडोदरा इथल्या कारखान्यात ही विमानं जुळवली जातील. २१,९३५ कोटी रुपयांच्या या करारामुळं जुन्या ताफ्याची जागा ही विमानं घेतील. सी-२९५ हे बहुपयोगी वाहतूक विमान सामरिक मोहिमा, माल वाहतुक आणि वैद्यकीय बचाव कार्यांसाठी महत्त्वाचं आहे.