March 15, 2025 2:51 PM March 15, 2025 2:51 PM
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ‘ड्रॅगन अंतराळ यान’ रवाना
गेल्या एक वर्षापासून अंतराळात अडकलेले नासाचे वैज्ञानिक सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ड्रॅगन अंतराळ यान घेऊन जाणारं फाल्कन ९ रॉकेट काल संध्याकाळी अंतराळात रवाना झालं. नासा आणि स्पेसएक्सच्या क्रू १० मिशन अंतर्गत हे यान काल अंतराळात निघालं. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होेते, मात्र अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांना परतता आलं नाही. त्यांना परत आणण्यासाठी नासा प्रयत्न करत आहे. सर्व काही ठरल्याप्रम...