November 14, 2025 2:56 PM November 14, 2025 2:56 PM
11
अंतराळात अडकलेले चिनी अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परतणार
अंतराळात अडकलेले तीन चिनी अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परत येणार आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांच्या माहितीनुसार, हे तीनही अंतराळवीर एप्रिलमध्ये तियांगोंग या अंतराळ स्थानकावर गेले होते आणि येत्या 1 नोव्हेंबरला पृथ्वीवर परत येणार होते. पण त्यांच्या शेनझोऊ-20 या अंतराळयानाला अंतराळातल्या मलब्याच्या एका छोट्या तुकड्याची धडक बसल्याचा संशय निर्माण झाल्याने त्यांची परतीची योजना रद्द करण्यात आली होती.