September 11, 2024 7:01 PM September 11, 2024 7:01 PM

views 13

सोयाबीन, कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी तसंच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल

सोयाबीन आणि कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारनं अनुकूलता दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत ही माहिती दिली.   विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील, असं त्यांनी सांगितलं. राज्यात ११ हजार ५०० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचं उद्दीष्ट असल्यानं कृषीपंपांना दिवसा वीज मिळण्याचा मा...