August 24, 2024 6:54 PM August 24, 2024 6:54 PM

views 11

परभणीतल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक वीम्याचे पैसे आठवडाभरात देण्याचे केंद्र सरकारचे आदेश

परभणी जिल्ह्यातल्या जवळपास दोन लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाच्या पिकविमा दाव्याचे प्रलंबित असलेले दोनशे ते सव्वा दोनशे कोटी रुयपे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने संबंधित पीक विमा कंपनीला प्रलंबित रक्कम एका आठवड्यात शेतकऱ्यांना देण्याचे आदेश आज दिले.  केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान २१ ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर परभणीतल्या शेतकऱ्यांनी पिकविम्याची समस्या ऐकून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या संदर्भात कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने केंद्रीय तांत्रिक सल्...