October 24, 2025 7:41 PM October 24, 2025 7:41 PM

views 42

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल न विकण्याचं आवाहन

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकू नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून खरेदी केंद्राचं जाळं निर्माण केलं आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. 

February 10, 2025 3:42 PM February 10, 2025 3:42 PM

views 9

लातूर : शेतकऱ्यांकडून सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्यासाठी आंदोलन

सोयाबीन खरेदी केंद्र पूर्ववत सुरु करून शेतकऱ्यांकडून सोयाबीन हमीभावानं  खरेदी करावं, या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे आंदोलन सुरु आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, छावा संघटना,  युवा सेना इत्यादी पक्षांचे काही  कार्यकर्ते बीएसएनएलच्या जवळपास दीडशे फूट उंच टॉवर वर चढले आहेत . शेतकऱ्यांकडे  हजारो टन सोयाबीन अद्यापही खरेदीविना पडून आहे. सरकारनं  किमान नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचचं  सोयाबीन हमी भावानं  खरेदी करावं  अन्यथा प्रति क्विंटल १ हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना द्यावं,...

December 16, 2024 10:30 AM December 16, 2024 10:30 AM

views 57

हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १४ डिसेंबरपर्यंत ५५१ खरेदी केंद्रांवर केवळ १ लाख ३१ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ डिसेंबरवरून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारनं ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या दोन संस्थांना दिले आहेत. ही खरेदी ६७ हजार ७५३ शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. राज्यात यासाठी ५८१ केंद्रांना खरेदीची ...

September 8, 2024 7:07 PM September 8, 2024 7:07 PM

views 14

राज्यात सोयाबीन, उडीद पिकांसाठी किमान हमीभावानं खरेदी केंद्रं सुरू करायला केंद्र सरकारची मान्यता

महाराष्ट्रासह कर्नाटकात ९० दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन आणि उडीद या दोन पिकांसाठी खरेदी केंद्रं सुरू करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. या निर्णयाबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

June 16, 2024 8:05 PM June 16, 2024 8:05 PM

views 36

कापूस, सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान

कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या मूल्यसाखळीला चालना देण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती योजना राबवत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलच्या mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.   चालु वर्षातल्या खरीप हंगामासाठी नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस या निविष्ठांसाठी ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर मेटाल्डीहाईड सोयाबीनसाठी २३ जूनपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. या...