October 16, 2025 8:36 PM October 16, 2025 8:36 PM

views 17

नैऋत्य मौसमी पावसाची संपूर्ण देशभरातून माघार

संपूर्ण देशातून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास आज पूर्ण झाला. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक आणि  केरळ-माहे या भागांत ईशान्य मान्सून पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. या प्रदेशात उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच पुढील सात दिवसांत या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

May 22, 2025 2:53 PM May 22, 2025 2:53 PM

views 14

नैऋत्य मान्सून लवकर सुरु होण्याची शक्यता

नैऋत्य मान्सून यंदा लवकर सुरु होण्याची शक्यता असून, येत्या २ ते ३ दिवसांमध्ये तो केरळमध्ये प्रवेश करेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये पुढले २ ते ३ दिवस जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता आहे.    आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरासह ईशान्य भारतात येत्या रविवारपर्यंत, तर पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, आणि उत्तराखंडमध्ये उद्यापर्यंत जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.    दरम्यान, श्रीलंकेत मान्सून सर्वदूर पोहोचल्य...

May 13, 2025 3:17 PM May 13, 2025 3:17 PM

views 14

नैर्ऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्रात दाखल

नैर्ऋत्य मोसमी पावसाने बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटं आणि उत्तर अंदमान सुद्राच्या काही भागात तो पोहोचला आहे. पुढच्या  ३-४ दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.   कोकणात उद्या सकाळपर्यंत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा तसंच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पुढचे तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा तसंच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस...

October 16, 2024 3:50 PM October 16, 2024 3:50 PM

views 7

नैऋत्य मान्सूनची देशभरातून माघार

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा भारतीय उपखंडावरुन परतीचा प्रवास काल पूर्ण झाला, त्याचवेळी ईशान्य मोसमी पाऊस सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात चेन्नईपासून सुमारे ४९० किलोमीटर अंतरावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आज पुद्दुचेरी आणि नेल्लोर दरम्यान उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची आणि येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.   चेन्नई, कुड्डालोर, एन्नोर, कट्टुपल्ली आणि पुद्दुचेरी इथ...

June 29, 2024 10:34 AM June 29, 2024 10:34 AM

views 15

देशात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू

नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली याराज्यांमधे मोसमी पाऊस दाखल झाला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल,झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्वेकडचा भाग आणि उत्तराखंडच्या काही भागातहीमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे.   कोकण, मध्य महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह अन्य काही राज्यात मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. गुजरात,कर्नाटकची किनारपट्टी तसंच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्येही काही ...