December 1, 2025 1:36 PM December 1, 2025 1:36 PM
39
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा विजय
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात काल रांची इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना पन्नास षटकात ३४९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला ३३२ धावांवर रोखण्यात भारताला यश आलं. त्याधी दक्षिण अफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतातर्फे विराट कोहलीनं आपलं ५२ वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावत नाबाद १३५ धावा केल्या. रोहित शर्मानं ५७ धावा केल्या. तर कर्णधार केएल राहुलनं ६० धावा केल्या. या प्रमुख खेळाडूंच्या ...