October 20, 2025 1:30 PM

views 29

दक्षिण मुंबईच्या कफ परेडमध्ये चाळीला लागलेल्या आगीत १५ वर्षीय युवकाचा मृत्यू

दक्षिण मुंबईच्या कफ परेड भागातल्या एका चाळीला आज लागलेल्या आगीत एका १५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं. तर, वरळीच्या महाकाली नगरमध्ये काल रात्री लागलेल्या आगीचा फटका ७ ते ८ झोपड्यांना बसला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

February 3, 2025 10:42 AM

views 30

ब्रिटनच्या माजी प्रधानमंत्र्यांची दक्षिण मुंबईतल्या पारसी जिमखाना क्लबला भेट

ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री ऋषि सुनक यांनी काल दक्षिण मुंबईतल्या पारसी जिमखाना क्लब इथ भेट दिली आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. पारसी जिमखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.