December 14, 2024 8:23 PM December 14, 2024 8:23 PM
5
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव मंजूर
दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव आज मंजूर झाला. हा प्रस्ताव २०४ विरुद्ध ८५ मतांनी संसदेत मंजूर झाला. यानंतर सर्वोच्च न्यायालय त्यांना पदच्युत करायचे किंवा पदावर ठेवायचे यावर हे निश्चित करेल. घटनात्मक न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना पदच्युत केलं तर साठ दिवसांच्या आत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक घेणं बंधनकारक आहे. त्यांना पदच्युत केलं तर महाभियोगाद्वारे पदच्युत झालेले येओल हे दक्षिण कोरियाचे दुसरे ऱाष्ट्राध्यक्ष ठरतील. न्यायालयाच्या निर्ण...