January 15, 2025 8:43 PM

views 25

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांना अटक

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांना पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर येओल यांना ग्योंगगी प्रांतातल्या ग्वानचेओन इथल्या तपास कार्यालयात नेण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात त्यांनी  मार्शल लॉ जारी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यावर नॅशनल असेंब्लीमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यांच्याविरुद्धच्या राष्ट्रद्रोहाच्या आरोपांची अद्याप चौकशी सुरू असून दक्षिण कोरियात राष्ट्रपतींना अटक होण्याची ही पहिली वेळ आहे.

August 17, 2024 2:48 PM

views 36

दक्षिण कोरिया प्रशासनानं एमपॉक्स संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण आणि निगराणी वाढवण्याचा निर्णय

दक्षिण कोरिया प्रशासनानं एमपॉक्स संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरण आणि निगराणी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमपॉक्सची साथ दक्षिण कोरियात पसरण्याची शक्यता आणि खबरदारीच्या उपायांसंदर्भात संबंधित तज्ञांशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. काँगोमध्ये एमपॉक्स रोगाची मोठी साथ आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं बुधवारी जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.