June 4, 2025 10:40 AM June 4, 2025 10:40 AM

views 9

दक्षिण कोरियात लिबरल पक्षाचे नेते ली जे-म्युंग विजयी

दक्षिण कोरियात झालेल्या निवडणुकीत लिबरल पक्षाचे नेते ली जे-म्युंग विजयी झाले असून, ते नवे राष्ट्रपती होणार आहेत. त्यांनी त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, सत्ताधारी पीपल पॉवर पार्टीचे नेते किम मून-सू यांचा पराभव केला. मून यांनी जनतेच्या निर्णयाचे नम्रपणे स्वीकार करत असल्याचे सांगत, ली यांचे अभिनंदन केले. मून यांनी सहा महिन्यांपूर्वी देशात मार्शल लॉ घोषित केला होता. त्यानंतर ही निवडणूक झाली असून, आता देशात राजकीय स्थिरतेमुळे अशांतता दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

June 3, 2025 10:42 AM June 3, 2025 10:42 AM

views 7

दक्षिण कोरियामध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान

दक्षिण कोरियामध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान सुरू आहे. यून सुक येओल यांना लष्करी राजवट लागू केल्यामुळे पदच्युत करण्यात आलं होतं. या निवडणुकीत उदारमतवादी ली जे म्युंग बाजी मारण्याची शक्यता असल्याचे संकेत स्थानिक पाहाणीत दिसून आले आहेत.