March 26, 2025 3:10 PM March 26, 2025 3:10 PM

views 10

दक्षिण कोरियात वणव्यामुळे १८ जणांचा मृत्यू, १९ जखमी

दक्षिण कोरियाच्या आग्नेय भागात लागलेल्या वणव्यामुळे किमान १८ जणांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले आहेत. सुमारे २३ हजारांहून अधिक जणांना बाहेर काढण्यात आलं असून शेकडो इमारतींचं नुकसान झालं आहे. अनेक वारसास्थळांचंही या वणव्यामुळे नुकसान झालं असून त्यात तेराशे वर्षं जुन्या बौद्ध मंदिराचाही समावेश आहे. वणवा आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे हजारो जवान आणि पाच हजार लष्करी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या वणव्यामुळे दक्षिण कोरियाचं १७ हजार हेक्टर परिसरातलं जंगलही नष्ट झालं आहे.

March 23, 2025 8:13 PM March 23, 2025 8:13 PM

views 16

दक्षिण कोरियात जंगलात लागलेल्या आगीमुळे अंतर्गत मंत्रालय भागात आपत्ती घोषित

दक्षिण कोरियात  जंगलात लागलेल्या आगीमुळे अंतर्गत मंत्रालयानं या भागात  आपत्ती घोषित केली आहे. ही आग देशाच्या आग्नेय भागातल्या जंगलांना लागली आहे. या आगीत कमीत कमी ४ जणांचा मृत्यू झाला असून प्रचंड नुकसान झालं आहे. उत्तर आणि दक्षिण ग्योंगसांग प्रांतात तसंच  आग्नेयेला उल्सान शहराला आग  लागली आहे.    आगीमुळे उल्सान आणि बुसानच्या दरम्यान असलेल्या  प्रमुख वाहतूक मार्गाबरोबर आग्नेयकडचे महामार्ग  बंद करण्यात आले आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि शेकडो अधिकारी मदत कार्यात सहभागी झाले आह...

January 27, 2025 12:39 PM January 27, 2025 12:39 PM

views 16

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना बंडाचं नेतृत्व केल्याप्रकरणी न्यायालयानं ठरवलं दोषी

दक्षिण कोरियाचे वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना, मागच्या महिन्यात त्यांच्या देशात झालेल्या बंडाचं नेतृत्व केल्याप्रकरणात, काल न्यायालयानं दोषी ठरवलं. देशात मार्शल लॉ लागू केल्यानंतर अशा आरोपांचा  सामना करणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. येओल यांच्यावर महाभियोग खटला देखील चालवला जात आहे. येओल यांना मदत केल्या प्रकरणात दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयानं याआधीच दोषी ठरवलं आहे. येओल यांना राष्ट्रध्यक्ष पदावरून औपचारिकरीत्या दूर करण्याबाबत सध्या न्या...

December 30, 2024 1:31 PM December 30, 2024 1:31 PM

views 10

दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्ष्यामुळे झाल्याची माहिती

दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्ष्यामुळे झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी विमानाला पक्ष्याची धडक बसू शकते, असा इशारा विमान नियंत्रकांनी दिला होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातातून वाचलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकानेही पक्ष्याची धडक बसल्याचा उल्लेख केला होता. मात्र, तरीही या अपघातामागच्या मूळ कारणाचा शोध अधिकारी घेत आहेत. या अपघातात आतापर्यंत १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात १७५ प्रवासी आणि ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

December 18, 2024 10:53 AM December 18, 2024 10:53 AM

views 10

दक्षिण कोरियाचे लष्करप्रमुख पार्क एन सू यांना अटक

दक्षिण कोरियाचे लष्करप्रमुख पार्क एन सू यांना काल अटक करण्यात आली. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष योन सूक येओल यांच्या अल्पकालीन लष्करी राजवटीत पार्क यांनी त्यांचे मुख्य कमांडर म्हणून काम पाहिले होते. त्यांच्यावर बंडखोरी तसंच सत्तेचा गैरवापर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याच्या आरोपाखाली न्यायालयानं त्यांना अटक करण्याचा आदेश दिला. लष्करी कायदा लागू करण्याच्या असफल प्रयत्न केल्याप्रकरणी दक्षिण कोरियात आत्तापर्यंत पार्क यांच्यासहीत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

December 4, 2024 8:05 PM December 4, 2024 8:05 PM

views 14

दक्षिण कोरियामधे अध्यक्ष यून सुक योल यांच्यावर महाभियोग चालवण्याचा विरोधी पक्षांचा संसदेत प्रस्ताव

दक्षिण कोरियामधे अध्यक्ष यून सुक योल यांच्यावर महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षसदस्यांनी संसदेत मांडला आहे. यून सुक योल यांनी काल अचानकपणे लष्करी राजवट लागू केली होती. त्याबद्दल त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. हजारो नागरिक निदर्शनं करीत रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे अवघ्या ६ तासात यून यांनी निर्णय मागे घेतला. या महाभियोग प्रस्तावावर येत्या शुक्रवारी मतदान होईल, असं विरोधी पक्ष सदस्य किम योंग मिन यांनी सांगितलं. ६ राजकीय पक्ष या प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याचं ते म्हणाले. प्रस्ताव मंज...

December 2, 2024 10:42 AM December 2, 2024 10:42 AM

views 10

कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्यफेरीत

ओमान मधील मस्कत इथं सुरू असलेल्या कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा ८-१ असा पराभव करत अ गटात अव्वल स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना उद्या मलेशियाशी होणार आहे.

September 16, 2024 10:17 AM September 16, 2024 10:17 AM

views 14

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारताचा दक्षिण कोरियाशी सामना

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्यफेरीत चीनच्या हुलुनबुर येथे आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. या स्पर्धेत भारत हा एकमेव अपराजित संघ आहे. भारताने या स्पर्धेत चीनचा 3-0, जपानचा 5-1, मलेशियाचा 8-1, कोरियाचा 3-1 आणि पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केला आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना चीनशी होणार आहे.

September 2, 2024 10:36 AM September 2, 2024 10:36 AM

views 17

दक्षिण कोरिया राबवणार सायबर सुरक्षा अभियान

दक्षिण कोरिया आपल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांचं, सायबर हल्ल्यापासून संरक्षण आणि अफवांचा मुकाबला करणं यासाठी आक्रमक सायबर सुरक्षा अभियान राबवणार आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सायबर सुरक्षा धोरणाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा परिषद ने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय संरक्षण आणि विज्ञान तसंच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयासह गुप्तचर संस्था, पोलिस तसंच 14 सरकारी संस्थांसह संयुक्तपणे आखलेल्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा मूलभूत योजनेचा प्रारंभ केला.   या योजनेद्वारे प्रतिकूल शक्तींपासून...

June 24, 2024 8:08 PM June 24, 2024 8:08 PM

views 23

दक्षिण कोरियात बॅटरी कंपनीला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू, २३ जण बेपत्ता

दक्षिण कोरियाची राजधानी सेओलमधल्या एका लिथियम बॅटरी उत्पादक कंपनीला आज लागलेल्या आगीत वीस जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण अजूनही बेपत्ता आहेत. बॅटरीची तपासणी आणि पॅकिंग केली जात असलेल्या मजल्यावर लागलेली आग गोदामात पसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आग लागली त्यावेळी कंपनीत ६७ कामगार काम करत होते.