December 9, 2025 8:33 PM December 9, 2025 8:33 PM

views 79

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ओदिशात कटक इथल्या बाराबती मैदानावर सुरु आहे.  दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या तिसऱ्याच चेंडूवर शुभमन गिल ४ धावा काढून बाद झाला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १४ षटकात ५ बाद १०४ धावा झाल्या होत्या. लुंगी नगिदीनं ३ गडी बाद केले. भारताच्या एकाही फलंदाजाला अर्थशतक झळकवता आलेलं नाही.     पाच सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा स...

November 16, 2025 3:47 PM November 16, 2025 3:47 PM

views 82

कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ३० धावांनी पराभव

कोलकाता इथं झालेला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आज तिसऱ्याच दिवशी भारतावर ३० धावांनी विजय मिळवला, आणि दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आज दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या ७ बाद ९३ धावांवरून पुढे सुरू केला. आठव्या गड्यासाठी कर्णधार टेम्बा बवुमा आणि कॉर्बिन यांनी ४४ धावांची भागिदारी केली. मात्र बुमरानं कॉर्बिनला त्रिफळाचित करून ही जोडी फोडली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमा, ५५ धावांची झुंजार खेळी करुन ...

November 13, 2025 1:42 PM November 13, 2025 1:42 PM

views 55

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार असून त्यातला पहिला उद्या कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरु होईल. भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिल कडे असून दक्षिण आफ्रिकेचा करणाधार तेंबा बावुमा आहे.   दक्षिण आफ्रिका अ आणि भारत अ संघादरम्यानचा एकदिवसीय सामना आज राजकोटमधे होईल.

June 13, 2025 10:11 AM June 13, 2025 10:11 AM

views 27

क्रिकेट – दक्षिण अफ्रिकेविरुध्द ऑस्ट्रेलियाची 218 धावांची आघाडी

आयसीसी करंडक विश्वचषक कसोटी क्रिकेट स्पर्धेतील लंडनमध्ये सुरू असलेल्या अंतिम सामन्यात कालच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेविरुध्द ऑस्ट्रेलियानं 218 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं 8 गडी बाद 144 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, पहिल्या डावात, दक्षिण आफ्रिकेचा संघ 138 धावांवर गारद झाला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सहा बळी घेतले होते.

March 11, 2025 6:19 PM March 11, 2025 6:19 PM

views 12

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू , ४५ जण जखमी

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं महामार्गावर पहाटे बस उलटून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला, तर ४५ जण जखमी झाले आहेत. बळींची संख्या वाढण्याची शक्यता आपत्कालीन व्यवस्थापनानं व्यक्त केली आहे.

March 5, 2025 8:37 PM March 5, 2025 8:37 PM

views 18

ICC Champions Trophy : न्यूझीलंडचं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी ३६३ धावांचं आव्हान

आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज लाहोर इथं  सुरु असलेल्या उपांत्य सामन्यात, न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी ३६३ धावांचं आव्हान ठेवलं आहे.    न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून ३६२ धावा केल्या. रचिन रवींद्र,  आणि केन विल्यमसन यांनी १७४ धावांची भागीदारी केली. रवींद्रनं १०८ तर विल्यमसननं १०२ धावा केल्या. डॅरिल मिचेल, आणि ग्लैन फिलिप्स यांनी प्रत्येकी ४९ धावांचं योगदान दिलं.    विजयासाठी मोठया लक्ष्याच...

March 1, 2025 3:37 PM March 1, 2025 3:37 PM

views 18

ICC Champions Trophy : शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका-इंग्लंड आमनेसामने

आयसीसी  करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत आज ब गटातला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडदरम्यान कराचीमधे होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.  इंग्लंडचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २०७ पेक्षा जास्त धावांनी पराभव झाला, तर अफगाणिस्तानची वर्णी उपांत्य फेरीत लागू शकते. 

January 15, 2025 2:16 PM January 15, 2025 2:16 PM

views 16

दक्षिण आफ्रिका: सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ८२ कामगारांची सुटका, ३६ मृत

दक्षिण आफ्रिकेतल्या नॉर्थ-वेस्ट परगण्यात एका सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ८२ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून ३६ मृतदेह हाती लागले आहेत. अजूनही शेकडो कामगार आत अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मदतकार्य सुरु आहे. बेकायदेशीर उत्खननावर कारवाई म्हणून पोलिसांनी गेल्या ऑगस्ट पासून बेकायदेशीर खाणींना वेढा घालून कामगारांची रसद तोडली होती. गेल्या नोव्हेंबरपासून खोलवर अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य हाती घेण्यात आलं होतं.

January 14, 2025 5:34 PM January 14, 2025 5:34 PM

views 17

दक्षिण आफ्रिकेतल्या खाणदुर्घटनेत किमान शंभर जणांचा मृत्यू

दक्षिण आफ्रिकेतल्या खाणदुर्घटनेत जमिनीखाली खोलवर अडकून किमान शंभरजणांचा  मृत्यू झाल्याचं  समोर आलं आहे. नॉर्थ वेस्ट परगण्यात असलेल्या या खाणीतल्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये सुटका आणि बचाव कार्य सुरु केलं होतं. सुटका झालेल्यांपैकी एकाच्या सेलफोनमध्ये खाणीत खोलवर गाडल्या गेलेल्या मृतदेहांचे फोटो असल्याचं आढळून आलं. त्यामुळे पोलिसांनी नव्याने शोधकार्य सुरु केलं.  त्यानंतर अठरा मृतदेह काढण्यात आले आहेत. हे लोक अवैधरित्या खाणीत उतरले असावेत असा अंदाज आहे. 

December 23, 2024 1:10 PM December 23, 2024 1:10 PM

views 12

दक्षिण आफ्रिकेत वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये १९ नागरीक ठार

दक्षिण आफ्रिकेत काल वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये १९ नागरीक ठार झालेत. लिम्पोपो भागात एन १ महामार्गावर सात गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर पाच जखमी झालेत. तर केप प्रांतात ट्रक आणि प्रवासी टॅक्सी यांच्यातच धडक होऊन झालेल्या  अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला.