December 20, 2025 1:25 PM December 20, 2025 1:25 PM

views 13

नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या निर्णयाला EDचं आव्हान

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयानं नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतरांवर ईडीनं आरोपपत्र दाखल केलं होतं. दिल्लीतल्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं हे आरोपपत्र फेटाळलं होतं मात्र याप्रकरणी तपास सुरू ठेवण्याची मुभा दिली होती. आरोपपत्र फेटाळण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची ईडीची मागणी आहे.

July 14, 2025 2:44 PM July 14, 2025 2:44 PM

views 10

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील गांधी कुटुंबाची पुढील सुनावणी २९ जुलैला होईल

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अन्य आरोपींविरोधात सक्तवसुली संचालनालयानं  दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेण्याचा आदेश दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयानं आज राखून ठेवला.  या प्रकरणाची  पुढील सुनावणी २९ जुलैला होईल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.    नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात काँग्रेस नेत्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचे आरोप झाले आहेत. या पुरवणी आरोपपत्रातले सर्व आरोप काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावले...

May 2, 2025 9:04 PM May 2, 2025 9:04 PM

views 22

मनी लाँड्रिगप्रकरणी सोनिया गांधी यांना नोटीस जारी

नॅशनल हेरॉल्ड कथित मनी लाँड्रिगप्रकरणी दिल्लीच्या रोऊज एव्हेन्यू न्यायालयानं काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज नोटीस जारी केली. सोनिया गांधी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिग प्रतिबंधक कायद्याखाली ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल का घेऊ नये, याची कारणं स्पष्ट करायला न्यायालयानं सांगितलं आहे.    या प्रकरणी ईडीनं तक्रार नुकतीच न्यायालयात दाखल केली, त्यावर नोटीस जारी करायला विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी गेल्या आठवडयात नकार दिला आणि त्यातल्य...

April 16, 2025 3:40 PM April 16, 2025 3:40 PM

views 9

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरील कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरीत असल्याचा काँग्रेसचा आरोप

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीने काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या प्रकरणी या दोन नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपनं काँग्रेसवर टीका केली असूनची काँग्रेसचा आरोप तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच हा खटला दाखल झाला असून, त्यावर राजकारण करण्याचा कोणताही अधिकार काँग्रेसला नाही, असं भाजप खासदार...

February 10, 2025 1:26 PM February 10, 2025 1:26 PM

views 15

१४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित

जनगणनेला विलंब झाल्यामुळे देशातले जवळपास १४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर जनगणना करावी अशी मागणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केली.   राज्यसभेत शून्य प्रहरा दरम्यान त्या बोलत होत्या. ग्रामीण भागातल्या नागरिकांना ७५ टक्के आणि नागरी भागातल्या नागरिकांना लाभ देणं हे अन्न सुरक्षा कायद्याचं उद्दिष्ट आहे, हा विशेषाधिकार नसून नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असंही गांधी म्हणाल्या. या कायद्यामुळे देशातल्या लाखो नागरिकांचं उ...