October 16, 2024 9:38 AM October 16, 2024 9:38 AM

views 23

आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सोनम मसकरला रौप्य पदक

नवी दिल्ली इथं काल झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सोनम मसकर हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. तिने 252 पूर्णांक 9 गुण मिळवले. या स्पर्धेत चीनच्या युतिंग हुआंगनं सुवर्ण, तर फ्रान्सच्या ओसियन मुलरनं कास्य पदक पटकावलं.