March 21, 2025 7:05 PM March 21, 2025 7:05 PM
36
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं स्पष्ट
परभणी इथं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचं दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं दिली. या प्रकरणातल्या विविध तक्रारींची सुनावणी काल आयोगासमोर झाली आणि आयोगानं मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, तसंच परभणीचे सीआयडी पोलीस उपअधीक्षक यांना नोटीस बजावली आणि अहवाल मागवले. तसंच दंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ज्या पोलिसांना सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार ...