August 11, 2024 8:00 PM August 11, 2024 8:00 PM

views 9

लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून ६ लाख १५ हजार १३६ अर्ज प्राप्त

राज्यशासनाच्यावतीनं सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातून  आतापर्यंत विविध ठिकाणाहून जवळपास ६ लाख १५ हजार १३६ अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५ लाख ४२ हजार ८१९ अर्ज जिल्हास्तरीय समितीनं पात्र ठरवले असून पुढील कार्यवाहीसाठी हे पात्र अर्ज शासनाला सादर करण्यात करण्यात आले आहेत. तर अपात्र ठरलेल्या जवळपास ५९ हजार ८९९ अर्जाची पुन्हा फेरतपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीनं  देण्यात आली आहे.

August 4, 2024 7:19 PM August 4, 2024 7:19 PM

views 20

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यासाठीचा १०० कोटींचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. श्रीक्षेत्र अरण तालुका माढा इथल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा आणि भक्तनिवास वास्तु...

July 7, 2024 2:59 PM July 7, 2024 2:59 PM

views 24

सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी मिळणार – उद्योगमंत्री चंद्रकांत पाटील

ऐतिहासिक वारसा असलेल्या सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पुन्हा उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपाययोजना आखण्याचं, आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पाटील यांनी काल सोलापूरच्या जिल्हा नियोजन मंडळासोबत बैठक घेतली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.

July 3, 2024 9:21 AM July 3, 2024 9:21 AM

views 14

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी १८७ पूर्णांक ३३ हेक्टर जमिनीपैकी, ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं आहे. त्यासाठी आतापर्यंत २४६ कोटी रुपये मावेजाचं वाटप करण्यात आलं आहे. येत्या चार महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास भू संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने प्रस्ताव दाखल करावे, यासाठी येत्या १० जुलै पासून गाव निहाय्य शिबीराचं आयोजन करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

June 19, 2024 7:00 PM June 19, 2024 7:00 PM

views 13

सोलापुरच्या २५० कोटीच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या २५० कोटीच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता दिली. त्यानुसार जल, कृषी, धार्मिक आणि वाइन उद्योगाला चालना दिली जाणार आहे. तसंच या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठा प्रेक्षागृह उभारलं जाणार आहे.