December 29, 2024 4:09 PM December 29, 2024 4:09 PM

views 13

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात भाविकांच्या बसला अपघात

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या भटुंबरे इथं आज सकाळी भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक वृद्ध महिलेचा आणि एका सात वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. ही बस पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने जात होती. या अपघातातल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

December 15, 2024 3:14 PM December 15, 2024 3:14 PM

views 10

सोलापुरात राष्ट्रीय लोकअदालतीत १९,८३१ प्रकरणे निकाली

सोलापूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत १९ हजार ८३१ प्रकरणं सामंजस्यानं निकाली लागली. लोकअदालतीच्या माध्यमातून १० जोडप्यांचं वैवाहिक आयुष्य पुन्हा मार्गी लागलं तर काही आर्थिक प्रकरणात सुमारे ७१ कोटी ५ लाख १४ हजार ६०५ रुपयांची तडजोड करून वाद मिटवण्यात यश आलं. ही लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सोलापूर जिल्हा न्यायालय आणि सोलापूरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी मोठं योगदान दिलं.

December 8, 2024 7:04 PM December 8, 2024 7:04 PM

views 19

‘मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ग्रामस्थांच्या निर्णयावर आक्षेप घेण्याचं कारण नाही’

मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार उत्तम जानकर हे देखील उपस्थित होते. मारकडवाडी ग्रामस्थांनी स्वतःच्या मतांची पडताळणी करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यास त्‍यावर प्रशासनानं आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही, असंही ते म्हणाले. मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी गावोगावी ठराव घेण्याची सूचना त्यांनी दिली. लोकशाही टिकविण्यासाठी ईव्हीएम मशीन नको ही चळवळ अधिक तीव्र कर...

October 9, 2024 7:21 PM October 9, 2024 7:21 PM

views 10

सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली

सोलापूर बाजार समितीत सोमवारी ३२५ तर ३३४ गाड्या कांदा आवक नोंदवण्यात आली. यावेळी जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे, तर नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत सोमवारी दोन हजार ते चार हजारांपर्यंत भाव होता. पावसाने भिजलेल्या कांद्याला प्रतिकिलो १० ते १५ रुपयांचा दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत सध्या नगर, नाशिक, धाराशिव, पुणे जिल्ह्यातून जुना कांदा येत आहे. आवक झालेल्या ३२५ गाड्यांमध्ये २०० गाड्या जुना कांदा होता तर १२५ गाड्या नवीन कांदा होता. काल देखील आवक ...

October 6, 2024 3:37 PM October 6, 2024 3:37 PM

views 11

सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणूका जाहीर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रवर्गातल्या संचालकांच्या १८ पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशपत्रं स्वीकारली जाणार आहेत. १४ ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार असून त्यानंतर २९ ऑक्टोबरला ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. मतदान१० नोव्हेंबरला होणार असून ११ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

October 3, 2024 3:06 PM October 3, 2024 3:06 PM

views 8

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू

तूळजापूरहून गोणेवाडी इथं देवीची ज्योत घेवून जाणारं चारचाकी वाहन सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती इथं उलटल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तसंच पाच जण जख्मी झाले आहेत. घटनास्थळी पोचल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. जखमींना नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

September 21, 2024 11:43 AM September 21, 2024 11:43 AM

views 11

महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कायद्याने साक्षर बनावे -अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित महिला सुरक्षा कार्यशाळेचं उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते झालं. कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक जीवनात वावरताना महिलांनी आपल्या सुरक्षिततेविषयी काळजी घ्यावी. अन्याय सहन न करता त्याविरुद्ध लढण्यास शिकावं आणि यासंदर्भातल्या कायद्यांविषयी साक्षर बनावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.  

September 15, 2024 6:21 PM September 15, 2024 6:21 PM

views 14

सोलापूरातील धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट

धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मागणी करत सोलापूर शहरात बेमुदत उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भेट घेतली. यावेळी माजी मंत्री प्रकाश शेंडगे हे देखील त्यांच्यासोबत होते. सरकार नेहमीच धनगर समाजाच्या पाठीशी असून या प्रश्नासंदर्भात उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक बोलावली आहे, असं पाटील यांनी यावेळी सांगितलं. ‘धनगर’ आणि ‘धनगड’ ठरवण्याचा अधिकार आदिवासी आयोगाला आहे. तरीही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत न...

September 1, 2024 7:30 PM September 1, 2024 7:30 PM

views 9

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’ उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करण्याच्या हेतूनं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस काका आणि पोलीस दीदी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. काल यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या उपक्रमाठी नियुक्त असलेले ८ पोलीस अधिकारी आणि २३ अंमलदार या बैठकीला उपस्थित होते. शिक्षक आणि शाळेतले इतर कर्मचारी, शिपाई यांची माहिती ठेवणं, शाळेतल्या मुलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना आहेत याबाबत जाणून घेण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

August 21, 2024 7:12 PM August 21, 2024 7:12 PM

views 9

उजनी पर्यटन आराखड्यासाठी २८० कोटी रुपयांच्या कामांना उच्च अधिकार समितीची मान्यता

सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण परिसरात करण्यात येणाऱ्या उजनी पर्यटन आराखड्यासाठी आवश्यक २८० कोटी रुपयांच्या कामांना राज्य शासनाच्या उच्च अधिकार समितीने आज मान्यता दिली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उजनी धरण पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून इथं अक्वॉटिक टुरिझम आणि वॉटर स्पोर्ट टुरिझम विकसित होऊ शकतं. या ठिकाणी जलतरण तलावाचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पा अंतर्गत धऱण परिसरात मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, सभागृह, बोर्ड रुम, रॉक पूल, ल...