October 15, 2025 7:06 PM October 15, 2025 7:06 PM

views 30

सोलापूर-मुंबई विमानसेवेला सुरुवात

सोलापूर-मुंबई या नव्या विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातल्या औद्योगिक विकासाला गती आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. सोलापूर-मुंबई विमान सेवेला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारला जाईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध पोलीस स्थानकांच्या इमारतीचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं.

June 9, 2025 3:45 PM June 9, 2025 3:45 PM

views 14

सोलापूर-मुंबई विमानसेवा येत्या ऑगस्टपासून सुरु होणार

सोलापूर-मुंबई विमानसेवा येत्या ऑगस्टपासून सुरु होईल असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. सोलापूर विमानतळावर सोलापूर - गोवा विमानसेवेचं उद्घाटन आज मोहोळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. सोलापूरहून बंगळुरू, तिरुपती आणि हैद्राबाद इथंही विमानसेवा लौकरच सुरु होईल, अशी माहिती मोहोळ यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खराब हवामानामुळे विमानाने या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत.