February 23, 2025 5:06 PM February 23, 2025 5:06 PM

views 3

सोलापुरात दुचाकी आणि बैलगाडीच्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं काल रात्री दुचाकी आणि बैलगाडी यांच्यात झालेल्या अपघातात बैलासह दुचाकीवरचे दोन तरुण जागीच ठार झाले. हे दोघेही मोहोळ तालुक्यातल्या पापरी इथले रहिवासी होते. अपघातात धायटी इथला  बैलगाडी चालकही जखमी झाला आहे.  बैलगाडी रत्नागिरी-सोलापूर  महामार्ग ओलांडून सांगोल्याच्या दिशेनं  जात असताना सोलापूरच्या दिशेनं चाललेली दुचाकी बैलगाडीवर आदळून हा अपघात झाला.

February 16, 2025 3:06 PM February 16, 2025 3:06 PM

views 4

सोलापुरात झालेल्या अपघातात तीघांचा मृत्यू

सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहराजवळ काल सायंकाळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. सोलापूरकडून हैद्राबादकडे जाणाऱ्या एका वाहनानं, रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकींना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.   दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर दुभाजक ओलांडून वाहन एका मोटार गॅरेजवर आदळलं त्याचवेळी रस्त्यावरुन येणाऱ्या अनेक वाहनांनाही धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या चौघांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.