December 1, 2025 1:32 PM December 1, 2025 1:32 PM
29
सोलापुरात रस्ते अपघातात ५ जणांचा मृत्यू
सोलापूर जिल्ह्यात बार्शी-लातूर महामार्गावर झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विवाह सोहळ्यानंतर नवदाम्पत्याला देवदर्शनासाठी तुळजापूरला घेऊन जाणारी कार आणि भरधाव ट्रक यांची धडक होऊन हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती, की कार पुलावरून खाली जाऊन तीन ते चारवेळा पलटी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं.