October 19, 2024 3:30 PM October 19, 2024 3:30 PM
8
समाजमाध्यमांच्या नोडल अधिकाऱ्यांना सायबर शाखेच्या नोटीसा
येत्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यु ट्यूब इत्यादीं समाजमाध्यमांवर अनेक खोट्या आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित होत आहेत. त्या काढून टाकण्यासाठी संबंधित समाजमाध्यमांच्या नोडल अधिकाऱ्यांना राज्य पोलिसदलाच्या सायबर शाखेने नोटीसा पाठवल्या आहेत. आतापर्यंत अशा सतराशेहून जास्त पोस्ट निदर्शनास आल्या असून त्यातल्या ३०० पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत.