January 6, 2025 1:00 PM January 6, 2025 1:00 PM

views 4

अमेरिकेत हिमवादळाची शक्यता

अमेरिकेच्या कॅन्सस, मिसूरी आणि इंडियाना सारख्या राज्यांमध्ये हिमवादळाची शक्यता असून सुमारे ६ कोटी लोकसंख्येला या हिमवादळाचा तडाखा बसू शकेल असा इशारा अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसनं दिला आहे. या हिमवादळामुळे ताशी ५० मैल वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता या भागातून प्रवास करताना काळजी घ्यावी असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.