February 20, 2025 8:46 PM February 20, 2025 8:46 PM
8
आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत पंकज अडवाणीला १४वं सुवर्ण पदक
आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय स्नूकरपटू पंकज अडवाणी यानं चमकदार कामगिरीचं प्रदर्शन करत चौदावं सुवर्ण पदक पटकावलं. ९३ आणि ६६ च्या ब्रेकसह त्याने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं. तसंच आपल्या अचूक रणनितीनं प्रतिस्पर्धी खेळाडूला मात दिली. या स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर तो एकाच वर्षात राष्ट्रीय, आशियाई आणि जागतिक स्नूकर स्पर्धा जिंकणारा खेळाडू ठरेल. बिलियर्ड्समधे त्याने हा विक्रम याआधीच केला आहे.