September 26, 2024 1:13 PM September 26, 2024 1:13 PM

views 10

जागतिक सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत भारताच्या कमल चावलाला अजिंक्यपद

आंतरराष्ट्रीय बिलिअर्ड्स आणि स्नूकर महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सिक्स रेड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कमल चावला यानं अजिंक्यपद मिळवलं आहे. मंगोलियात उलानबातर इथं झालेल्या या स्पर्धेत कमल चावलानं पाकिस्तानच्या अस्जद इक्बालचा 6-2 असा पराभव केला. भारताचे मालकितसिंग, विद्या पिल्लई आणि कीर्तन पंडियान यांनाही विविध विभागांमध्ये कास्यपदकं मिळाली आहेत. महिलांमध्ये गेल्या वर्षी अजिंक्यपद मिळवणाऱ्या भारताच्या विद्या पिल्लईला अजिंक्यपद राखता आलं नाही आणि कास्यपदकावर समाधान मानावं लाग...