October 28, 2025 7:31 PM October 28, 2025 7:31 PM

views 42

महिला क्रिकेटमधे एकदिवसीय क्रिकेट मानांकनात स्मृती मंधाना अग्रस्थानी

महिला क्रिकेटमधे एकदिवसीय क्रिकेटच्या मानांकनात भारताच्या स्मृती मंधानानं अग्रस्थान मिळवलं आहे. या मानांकनात तिची गुणसंख्या ८२८ आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशले गार्डनरपेक्षा ती शंभराहुन अधिक गुणांनी पुढं आहे. तिची सलामीची जोडीदार प्रतिका रावल ५६४ गुणांसह २७ व्या स्थानावर आहे.  गोलंदाजीत, इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन  ७४७ गुणांसह अग्रस्थानी आहे.

June 17, 2025 7:23 PM June 17, 2025 7:23 PM

views 8

आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मंधाना अव्वल

आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रिकेटमधे फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या स्मृती मंधाना हिनं अव्वल स्थान पटकावलं आहे. तिच्याकडे ७२७ गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड हिची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून तिच्यासह इंग्लंडची सायव्हर ब्रंट ही संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. स्मृतीनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान दुसऱ्यांदा पटकावलं आहे.  

January 27, 2025 4:02 PM January 27, 2025 4:02 PM

views 20

स्मृती मानधनाला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं महिला एकदिवसीय क्रिकेट मधे सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिला जाहीर केला आहे. गेल्या वर्षभरात तिनं १३ एकदिवसीय सामन्यांमधे मिळून ७४७ धावा करुन विक्रमाची नोंद केली. यात ४ शतकी खेळी होत्या. हा देखील महिला क्रिकेटमधला विक्रम आहे. तिच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतल्या २४ सामन्यांमधे मिळून तिने यंदा १ हजार ३५८ धावा पूर्ण केल्या.

December 23, 2024 1:11 PM December 23, 2024 1:11 PM

views 29

एकदिवसीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा स्मृती मंधानाचा विक्रम

महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांत एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्मृती मंधानानं नोंदवला आहे. काल वडोदरामध्ये वेस्ट इंडिज संघाबरोबर झालेल्या सामन्यात स्मृतीनं ९१ धावा केल्यामुळे तिनं या वर्षी केलेल्या धावांची संख्या १ हजार ६०२ झाली आहे. त्यामुळे स्मृतीनं दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्टचा एक हजार ५९३ धावांचा विक्रम मोडला आहे.

July 10, 2024 3:12 PM July 10, 2024 3:12 PM

views 11

जसप्रीत बुमराह आणि स्मृती मन्धाना आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान जून २०२४ करता जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना या भारतीय क्रिकेटपटूंनी मिळवला आहे.  नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुमराहच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला विश्वचषकाला गवसणी घालता आली. या स्पर्धेतल्या ८ सामन्यात मिळून बुमराहनं १५ गडी बाद केले. महिला क्रिकेटपटू स्मृती मान्धना हिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल तिला हा बहुमान मिळाला आहे. तिनं इंग्लंडच्या माईया बौशेअर आणि श्रीलंकेच्या विश...