April 14, 2025 1:59 PM April 14, 2025 1:59 PM

views 12

स्मार्टफोन, संगणकावर अमेरिका आयात शुल्क लावणार

स्मार्टफोन, कम्प्युटर, सेमीकंडक्टर आणि त्यांच्या सुट्या भागांवर येत्या १-२ महिन्यात अमेरिका स्वतंत्र आयात शुल्क लावणार आहे. औषधी उत्पादनांच्या आयातीवरचे, विशेषतः चीनमधून होणाऱ्या आयातीवरचे शुल्क वाढवण्याचाही अमेरिकेचा विचार आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी काल ही माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना आयात शुल्कातून वगळण्याचा निर्णय अमेरिकेनं जाहीर केला होता. या उपकरणांच्या चिप आणि टीव्हीचे भाग दक्षिण आशियाई देशातून आयात करण्याऐवजी अमेरिकेतच उत्पादित करण्याची ...

April 13, 2025 2:27 PM April 13, 2025 2:27 PM

views 11

स्मार्टफोन, संगणक यांना सवलत देण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेने नव्याने जाहीर केलेल्या करांमधून स्मार्टफोन आणि संगणक यांना सवलत देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या जकात आणि सीमा सुरक्षा विभागाने दिलेल्या सुचनांनुसार, अमेरिकेत आयात होणाऱ्या या दोन्ही वस्तूंसाठी बहुतेक देशांसह चीनला देखील अतिरिक्त करातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा सेमीकंडक्टर, सोलर सेल आणि मेमरी कार्डसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि घटक यामध्ये होणार आहे.

December 17, 2024 2:57 PM December 17, 2024 2:57 PM

views 11

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत भारत जगातला तिसरा निर्यातदार देश

स्मार्टफोन्सच्या निर्यातीत  २०१९  साली  जगात २३ व्या क्रमांकांवर असलेला भारत आता स्मार्टफोन्सचा जगातला तिसरा निर्यातदार देश बनला आहे. नोव्हेंबर मध्ये देशातल्या स्मार्टफोन निर्यातीनं एकाच महिन्यात २० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी या यशाचं  मेकिंग भारत स्टोरी  या शब्दांत कौतुक केलं. उत्पादन आधारित परतावा   धोरणाच्या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात ७० ते ७५ टक्के निर्यातीचं ठरवलेलं  उद्दिष्ट  यामुळे अगोदरच गाठलं गेलं आहे...