December 14, 2024 10:25 AM December 14, 2024 10:25 AM

views 3

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४च्या सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांची चमकदार कामगिरी

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४च्या सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. या फेरीत कन्व्हर्सेशनल इमेज रेकग्निशन चॅटबॉट', 'महिला सुरक्षा', 'ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी एआय आधारित उपाय', 'लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग आदी मुद्यांवर या संघांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. यात मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूरच्या यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग, नवी मुंबईतल्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या जेएनईसी तसंच राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ...

December 13, 2024 7:47 PM December 13, 2024 7:47 PM

views 12

नागपूरमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या सातव्या अंतिम फेरीचा समारोप

नागपूरच्या हिंगणा येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या सातव्या अंतिम फेरीचा समारोप आज पार पडला. या स्पर्धेतील ज्यूरी सदस्यांनी केलेल्या मूल्यांकनावर आधारित, कौशल्य विकास मंत्रालयाने दिलेल्या ४ समस्यांवर उपाय सुचवणाऱ्या संघांना विजेते घोषित केले. विजेत्या संघांत श्री साईराम अभियांत्रिकी महाविद्यालय चेन्नई, व्यंकटेश्वरा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग बंगलोर, एक्रोपोलिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इंदूर आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आंध्र प्रदेश यांच...

December 12, 2024 7:43 PM December 12, 2024 7:43 PM

views 7

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४ च्या सॉफ्टवेअर एडिशनचा आज समारोप

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४ च्या सॉफ्टवेअर एडिशनचा आज समारोप होत आहे. मुंबईत संध्याकाळी समारोप सत्र होईल. मुंबईत हॅकेथॉन चं आयोजन एल एन वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्थेनं केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, विश्लेषण, प्रतिमा विश्लेषण आणि समस्या या विषयांवरल्या स्पर्धांमध्ये ३४ संघ सहभागी झाले होते. पुण्यात हॅकेथॉनचं आयोजन एमआयटी कला, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने केलं होतं. नागपूरमध्ये जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात हॅकेथॉन आयोजित केलं होतं.  स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फ...

December 11, 2024 6:48 PM December 11, 2024 6:48 PM

views 9

सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीला देशात सरुवात

सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी आज देशभरातल्या ५१ केंद्रांवर सुरु झाली. यात राज्यातल्या चार केंद्रांचा समावेश आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दूरस्थ माध्यमातून याचं  उदघाटन केलं. देशातले विद्यार्थी हेच विकसित भारताचे चालक असल्याचं प्रधान यांनी यावेळी सांगितलं. युवावर्गाची बुद्धिमत्ता, व्हिजन, मेहनत, उत्साह, नेतृत्वगुण आणि नवोन्मेष यामुळे २१ व्या शतकातली ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय होईल आणि अनेक विकसनशील देशांसाठी ते आदर्श विकास प्रारूप ठरेल, असा विश्...

December 10, 2024 10:36 AM December 10, 2024 10:36 AM

views 9

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी युवा पिढीशी प्रधानमंत्री उद्या संवाद साधणार

स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी होत असलेल्या युवा पिढीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरस्थ माध्यमातून संवाद साधणार आहेत. या स्पर्धेत १३०० हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. मुंबई पुण्यासाह देशातल्या ५१ केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. पुण्याच्या एमआयटी विद्यापीठामध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर गटाची अंतिम फेरी होणार आहे.

December 9, 2024 6:48 PM December 9, 2024 6:48 PM

views 18

पुण्यामध्ये राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा ११ डिसेंबरला होणार

पुण्यामध्ये राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीची सुरूवातही येत्या ११ डिसेंबरला एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात होणार आहे. ही स्पर्धा ११ ते १५ डिसेंबर दरम्यान होणार असून देशभरातून  २७ संघ, १६८ स्पर्धक आणि ३२ मार्गदर्शक सहभागी होतील.  कृषी, मेडटेक, वारसा आणि संस्कृती, फिटनेस आणि स्मार्ट ऑटोमेशन या क्षेत्रांतल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही स्पर्धा होणर असून विजेत्यास 1 लाख रूपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

December 9, 2024 6:45 PM December 9, 2024 6:45 PM

views 8

मुंबईतल्या प्रा. एल.एन. वेलिंगकर संस्थेमध्ये येत्या ११, १२ डिसेंबरला स्मार्ट इंडिया हॅकथॉनचं आयोजन

मुंबईतल्या प्रा. एल.एन. वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्थेमध्ये येत्या ११ आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी  'स्मार्ट इंडिया हॅकथॉन' या राष्ट्रीय स्तरावरील महाअंतिम फेरीचं आयोजन केलं आहे.  शिक्षण मंत्रालय आणि भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री कार्यालयानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे.  या वर्षीच्या हॅकाथॉनमध्ये ५४ मंत्रालये, विविध केंद्रीय विभाग आणि उद्योगांनी सादर केलेल्या २५० हून अधिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्र प्रेमाला महत्व देण्यात आलं आहे.  या स्पर्धा...