May 15, 2025 7:42 PM May 15, 2025 7:42 PM

views 18

एसटी महामंडळ ३,००० स्मार्ट बसगाड्या खरेदी करणार

सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळ ३,००० स्मार्ट बसगाड्या खरेदी करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. बस बांधणी कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बसगाड्यांमधे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरे, जीपीएस तंत्रज्ञान, वायफाय, टीव्ही, बस लॉक प्रणाली, आग प्रतिबंधक यंत्रणा असेल.   या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच बसच्या अपघातांची संख्या कमी करणं, तसेच वक्तशीरपणा वाढवायला देखील मदत होणार आहे, असं सरनाईक म्हणाले.