November 27, 2025 1:18 PM

views 15

‘स्कायरूट’ या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन

भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात सरकारने अनेक सुधारणा केल्या असून जगातले गुंतवणूदार याकडे आकर्षित होत आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीने केलं, त्यावेळी ते बोलत होते. अंतराळ संशोधन क्षेत्र खासगी नवोन्मेषासाठी खुलं करण्यात आल्यामुळे स्टार्टअप आणि उद्योगांना देशाच्या वैज्ञानिक परिसंस्थेत काम करणं सुलभ झालं, येणाऱ्या काळात जागतिक अंतराळ क्षेत्र अर्थव्यवस्था झपाट्याने वाढणार असू...