February 8, 2025 11:12 AM February 8, 2025 11:12 AM

views 5

स्किल इंडिया योजना 2026 पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता

कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणारी स्किल इंडिया योजना 2026 पर्यंत सुरू ठेवण्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. या योजनेसाठी 2022-23 ते 2025-26 या वर्षाकरता केंद्रानं आठ हजार 800 कोटी रुपये मंजूर केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. मागणीवर आधारित कौशल्य विकासावर केंद्र सरकारनं लक्ष केंद्रित केलं असून गुणवत्ता वाढीवर भर दिला जाणार असल्याचं वैष्णव म्हणाले. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठीच्या राष्ट्र...