September 12, 2024 8:24 PM September 12, 2024 8:24 PM
12
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं आज नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. श्वासलिकेत संसर्ग झाल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. मागच्या पाच दिवसांपासून त्यांना जीवरक्षण प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. आज दुपारी तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. येचुरी यांचं पार्थिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात शनिवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंत...