November 20, 2025 7:28 PM November 20, 2025 7:28 PM
13
मतदार यादी पुनरीक्षणाच्या दुसऱ्या टप्पात ५० कोटींहून अधिक अर्ज वितरित
नोव्हेंबर महिन्याच्या ४ तारखेला मतदार यादी पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून ५० कोटींहून अधिक गणना अर्ज वितरित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे १५ कोटी ३७ लाख गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये ७ कोटी ६४ लाखांहून जास्त अर्ज वितरित झाले आहेतय दुसऱ्या टप्प्यात नऊ राज्यं आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया सुरू केली असून पुढच्या महिन्यात ४ तारखेपर्यंत हा टप्पा सुरू राहील.