December 10, 2024 7:24 PM

views 12

देशातल्या एसआयपीमधला गुंतवणुकीचा ओघ सलग दुसऱ्या महिन्यात २५ हजार कोटी रुपयांच्यावर

देशातल्या एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधला गुंतवणुकीचा ओघ सलग दुसऱ्या महिन्यात २५ हजार कोटी रुपयांच्यावर पोहोचला आहे. असोसिएशन फॉर म्युच्युअल फंड्स इन इंडियाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील एकूण गुंतवणूक ऑक्टोबर महिन्यात ६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसंच, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्समध्ये वाढ होऊन नोव्हेंबर महिन्यात त्या जवळपास ६१८ कोटी रुपये झाल्या आहेत. तसंच, स्मॉल कॅप फंडमध्ये ९ टक्क्याची वाढ होऊन ४ हजार ११२ कोटी रुप...

September 2, 2024 8:18 PM

views 12

गुंतवणूकदारांना लवकरच अडीचशे रुपयाची SIP करता येणार – सेबी

देशातल्या गुंतवणूकदारांना लवकरच अडीचशे रुपयाची SIP करता येणार आहे. यामुळं अधिकाधिक लोकांपर्यंत या गुंतवणूक सुधारणांचे फायदे पोहोचतील अशी माहिती सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी दिली. म्युच्युअल फंड उद्योगासोबत या प्रस्तावावर काम सुरू आहे, असं त्या म्हणाल्या. IPO सोबत दिलं जाणारं माहितीपत्रक १५-१६ प्रादेशिक भाषांमध्ये असावं, अशी गरज त्यांनी व्यक्त केली.