October 3, 2025 1:31 PM October 3, 2025 1:31 PM

views 32

गायक झुबीन गर्गचा शवविच्छेदन अहवाल सिंगापूरच्या भारतीय उच्चायुक्तालयाकडे सुपूर्द

आसामी गायक झुबीन गर्ग याचा शवविच्छेदन अहवाल सिंगापूर पोलीस दलानं सिंगापूरच्या भारतीय उच्चायुक्तालयाकडे सुपूर्द केला. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.    दरम्यान, आसाम पोलिसांच्या गुन्हे तपास विभागानं झुबीन गर्ग यांचे सहकारी शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रवा महंत यांना आज अटक केली. सिंगापूर इथं झालेल्या ईशान्य भारत महोत्सवाचे मुख्य आयोजक श्यामकानू महंत आणि झुबीन गर्ग यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. हे दोघे सध्या पोलीस कोठडीत आहेत.

September 23, 2025 2:44 PM September 23, 2025 2:44 PM

views 57

आसामी गायक जुबीन गर्ग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ख्यातनाम आसामी गायक  झुबीन गर्ग यांच्या पार्थिवावर आज गुवाहाटी जवळ कामरूप जिल्ह्यातल्या  कामरकुची या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामानं  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि सर्बानंद सोनोवाल यांच्यासह अनेक मान्यवर आणि झुबीन यांचे हजारो चाहते उपस्थित होते.    जुबिन गर्ग यांचं गेल्या शुक्रवारी सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून निधन झालं होतं. ते ईशान्य भारत महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेले होते.    गायक, गीतकार, संगीतकार, चित्...

September 19, 2025 8:28 PM September 19, 2025 8:28 PM

views 74

प्रसिद्ध आसामी गायक झुबिन गर्ग यांचं निधन

प्रसिद्ध आसामी गायक झुबिन गर्ग यांचं सिंगापूर मध्ये स्कूबा ड्रायव्हिंग अपघातात निधन झालं. ते ५२ वर्षांचे होते. गर्ग हे सिंगापूर इथे नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र, समुद्रात स्कुबा डायव्हिंग करताना त्यांचा अपघात झाला. क्रिश ३, गँगस्टर, नमस्ते लंडन यासारख्या चित्रपटात त्यांनी गाणी गायली होती. याशिवाय संगीतकार, संगीत दिग्दर्शक, अभिनेता आणि चित्रपट निर्माता त्यांनी काम केलं होतं. आसामी, हिंदी, बंगाली आणि इतर अनेक भारतीय भाषांमधल्या गाण्यांना आपला आवाज दिला होता. प्रधान...