January 16, 2025 10:30 AM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांची नवी दिल्लीत घेणार भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांची नवी दिल्लीत भेट घेतील. षण्मुगरत्नम राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा करतील. राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी देखील देतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत सिंगापूरच्या अध्यक्षांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी सेमीकंडक्टर, औद्योगिक उद्याने, कौशल्य विकास, डिजिटलायझेशन आणि व्यापार विकास या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा केली. डॉ. जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात सांग...

January 14, 2025 9:47 AM

views 26

सिंगापूरचे राष्ट्रपती थरमन षणमुगरत्नम पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

भारत आणि सिंगापूर दरम्यानच्या द्विपक्षीय धोरणात्मक संबंधाना ६० वर्ष पूर्ण होत असून, या पार्श्वभूमीवर सिंगापूरचे राष्ट्रपती थरमनषणमुगरत्नम हे आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याबरोबर एक उच्च स्तरीय शिष्टमंडळही येत आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती थरमन षणमुग रत्नम हे राष्ट्रपती द्रौपदी मुरमू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसच १७ आणि १८ जानेवारीला ते ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.