May 10, 2025 3:49 PM May 10, 2025 3:49 PM

views 19

जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाचे ५ दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमधे ठार

जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनांचे ५ दहशतवादी ऑपरेशन सिंदूरमधे मारले गेल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. मुदस्सर खादियान खास उर्फ अबु जुंदाल, मौलाना मसूद अझहरचा मेव्हणा हाफिज मुहम्मद जमील, मोहम्मद युसुफ अझहर, खालीद उर्फ अबु अकाशा आणि मोहम्मद हसन खान अशी त्यांची नावं आहेत. गेल्या गुरुवारी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेत ते ठार झाले.