November 8, 2025 7:07 PM

views 34

कुडाळ MIDCमध्ये पडीक भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ एमआयडीसीत वर्षानुवर्षे  भूखंड पडीक ठेवत त्यावर उद्योग न उभारलेल्या भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेत. कुडाळ एमआयडीसी इंडस्टीज असोसिएशनतर्फे बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आज सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

November 8, 2025 5:57 PM

views 22

‘सिंधुदुर्गात निवडणूक महायुती म्हणून लढण्यासाठी शिवसेना सकारात्मक’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक महायुती म्हणून लढण्यासाठी शिवसेना सकारात्मक आहे, मात्र युती झाली नाही तर शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी तयार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. ते आज सिंधुर्ग इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंधुदुर्गात नारायण राणे हे महायुतीचे नेते आहेत, त्यांच्या भूमिकेशी आपण सहमत आहोत असं सामंत म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचं निश्चित झालं आहे, असंही सामंत यांनी सांगितलं. 

February 22, 2025 7:53 PM

views 32

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली इथं दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली इथं दोन पर्यटकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्याहून आलेले हे तीन जण आज सकाळी तारकर्ली समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. त्यांना बचाव पथकानं बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं.

January 24, 2025 8:04 PM

views 22

सिंधुदुर्गतल्या कुडाळ नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी सिद्धिविनायक पॅनल प्रणित महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर यांची निवड झाली. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सई काळप यांचा अवघ्या एका मतानं पराभव केला. कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी प्राजक्ता बांदेकरांचं अभिनंदन केलं असून पारदर्शक कारभाराची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

December 31, 2024 7:17 PM

views 17

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्गात पर्यटक दाखल

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. त्यामुळे समुद्रकिनारे  आणि पर्यटन स्थळ पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.  गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पर्यटन हंगाम तेजीत आहे. त्यामुळे लाखोंची उलाढाल होत आहे. जिल्ह्यातल्या शिरोडा, वेंगुर्ले, देवगड, मालवण या महत्त्वाच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी आहे. नाताळ सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी पर्यटन व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली होत...

November 10, 2024 3:19 PM

views 23

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदार संख्येत ६,८७५ मतदारांची वाढ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीला पुरवणी यादी जोडली आहे. त्यामुळे एकूण मतदार संख्येत ६ हजार ८७५ मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ एकूण मतदार असून त्यात ४ हजार ७२ महिला मतदार तर २ हजार ८०१ पुरुष मतदार आणि दोन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

October 17, 2024 9:23 AM

views 13

सिंधुदुर्गात चित्रकथी रामायण महोत्सव 2024 चे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या सहयोगानं आणि दायती लोककला संवर्धन अकादमी पिंगुळी यांच्या आयोजनातून आज आणि उद्या ठाकरवाडी म्युझियममध्ये चित्रकथी रामायण महोत्सव 2024 चं आयोजन करण्यात आल आहे.चित्रकथी या कला प्रकाराला घेऊन आयोजित होणारा महोत्सव हा इतिहासातला पहिलाच महोत्सव असून हा महोत्सव दोन दिवस चालणार आहे.     नामवंत चित्रकथी कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. तसेच रामायण आणि चित्रकथी परंपरा यावर चर्चासत्र सुद्धा होणार आहे. ठाकर आदिवासी कलाकारांची चारशे वर्...

October 14, 2024 7:06 PM

views 16

मविआचं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन

महाविकास आघाडीच्यावतीनं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ७० टक्क्यांहून अधिक पदं रिक्त असून नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.  याबाबत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तसंच अधिष्ठाता यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

October 1, 2024 7:27 PM

views 19

शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पुतळा उभारताना योग्य काळजी घेतली नाही. पुतळ्याच्या उभारणीतलं साहित्य निकृष्ट दर्जाचं होतं, असा सरकारी वकिलांचा युक्तीवाद जामीन फेटाळताना न्यायालयानं मान्य केला.