November 11, 2025 8:34 PM

views 20

सिंधुदुर्गात मुलगी जन्माला येताच आधार कार्डासह विविध प्रमाणपत्र देऊन स्वागत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलगी जन्माला येताच आधार कार्डासह विविध प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्याचा उपक्रम महिला आणि बालकल्याण विभागानं हाती घेतला आहे.   (जन्माला येणाऱ्या मुलींच स्वागत करताना त्या मुलींचं आधार कार्ड, आभाकार्ड, वय  अधिवास आणि राष्ट्रीयत्वाच प्रमाणपत्र तसंच जात प्रमाणपत्र सुद्धा देण्याची संकल्पना जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदारांमार्फत प्रत्येकी १० ते १५ मुलींच वेगवेगळी प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  अशा प्र...

October 25, 2025 8:09 PM

views 200

AI चा वापर करणारा सिंधुदुर्ग देशातला पहिला जिल्हा

प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करणारा देशातला पहिला जिल्हा ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी  नीती आयोगाचं एक पथक ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्गात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी आज ओरोस इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निती आयोगाचं पथक या दौऱ्यात आरोग्य, शिक्षण, संरक्षण आणि कृषी विभागात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने सुरु असलेल्या कामांचा अभ्यास करणार आहे.    सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून क...

October 15, 2025 7:46 PM

views 39

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विकासकामांना मंजुरी

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीने जिल्ह्यातल्या विकासकामांना मंजुरी दिली असून निधी वितरण करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला २०२५-२६ साठी २८२ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यातील तीस टक्के म्हणजे ८४ कोटी ६० लाख रुपये जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाले आहेत. या निधीपैकी ५८ कोटी २६ लाख रुपये विविध विकासकामांसाठी वितरित झाल्याचं प्रशासनानं सांगितलं. निधी वेळेवर वितरीत केला जावा तसंच गुणवत्तापूर्ण काम करावं असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. 

September 19, 2025 7:29 PM

views 32

Seva Pakhwada: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शाळा तिथे दाखला’ उपक्रम

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामार्फत 'शाळा तिथे दाखला'  उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना लागणाऱ्या दाखल्यांसाठी महसूल विभाग शाळेतून अर्ज भरुन घेतल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुन दोन ते चार दिवसात दाखले वितरीत करेल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.     सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त  सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पडतेवाडी इथल्या शाळेला भेट दिली.

June 17, 2025 6:42 PM

views 14

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साकवांची तपासणी

पुणे जिल्ह्यात मावळ इथं पूल दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साकवांची तातडीनं तपासणी केली. त्यामध्ये ८१३ साकवांपैकी केवळ १६९ साकव सुस्थित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.   मावळ पूर दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तात़ीनं साकवांच्या तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार केलेल्या तपासणीत ४०६ साकवांची दुरुस्ती करणं आवश्यक असून त्यासाठी ३३ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची तर ३१३ ठिकाणी नवीन साकव बांधण्याची आवश्यकत...

April 9, 2025 7:22 PM

views 40

देवरहाटी जमिनींवरच्या विकासकामांसाठी अहवाल सादर करण्याचे महसूल राज्यमंत्र्यांचे आदेश

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवरहाटी जमिनींवरच्या विकासकामांसाठी येत्या १५ दिवसांत महसूल आणि वन विभागाने अहवाल सादर करावेत, असे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज दिले. कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. देवरहाटी जमिनीच्या विकासाचा प्रश्न संवेदनशील असला तरी न्यायालयीन निर्णय, कायदेशीर बाबी आणि स्थानिक जनतेच्या भावना यांचा समतोल राखूनच निर्णय घेतला जाईल, असंही कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं.

April 6, 2025 10:48 AM

views 19

सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी कणकवलीसह काही भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यानं, शहरासह अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.अवकाळी पावसामुळे आंबा, काजू आणि जांभूळ पिकांचं मात्र नुकसान झालं आहे.

April 4, 2025 2:40 PM

views 22

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापन करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापन करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातल्या संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यानी दिल्या.   तिलारी प्रकल्पाच्या संरक्षित भागात या हत्तींच्या उपजीविकेसाठी बांबू, केळी, फणस अशी झाडं लावावीत. हत्तींचा वावर असलेल्या परिसरात रेल्वे रुळांच्या बाजूनं कुंपण घालावं, ...

March 11, 2025 4:02 PM

views 29

वैभववाडी-गगनबावडा घाट रस्त्यावर आता पुन्हा गाड्या धावणार

सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणारा वैभववाडी-गगनबावडा घाट रस्ता आजपासून खुला करण्यात आला आहे. हा घाटरस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी गेल्या १५ जानेवारीपासून बंद केला होता.   काही दिवसांपूर्वी या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु झाली होती आणि आजपासून दुहेरी वाहतूक सुरु करण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दाजीपूर -राधानगरी मार्ग ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्यानं या नव्यानं सुरु झालेल्या रस्त्याचा उपयोग वाहनचालकांना करता येणार आहे.

February 21, 2025 7:21 PM

views 17

सिंधुदुर्गात तीन दिवसीय ठाकर लोककला महोत्सवाचं आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या  पिंगुळी इथं तीन दिवसीय ठाकर लोककला महोत्सव आयोजित केला आहे.  या महोत्सवाचं उदघाटन उद्या सकाळी ११.३० वाजता वाजता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे  यांच्या उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवादरम्यान राधा नृत्य, कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी, पांगुळ बैल, पोवाडा, पोतराज, तारवागीत आणि डोनागीत यांसारख्या  विविध ठाकर लोककला सादर केल्या जाणार आहेत. अशा प्रकारचा लोककला महोत्सव शासनानं पहिल्यांदाच...