December 10, 2025 8:28 PM December 10, 2025 8:28 PM

views 5

चांदीच्या दराचा नवा विक्रम

देशात चांदीच्या दरांनी आज नवी उच्चांकी पातळी गाठली. कालच्या तुलनेत साडे ६ हजार रुपयांनी चांदी महाग झाली आणि मुंबईच्या बाजारपेठेत एक किलो चांदीसाठी १ लाख ९१ हजार रुपये मोजावे लागत होते. काल १ किलो चांदी १ लाख ८४ हजार रुपये दराने मिळत होती.  सोन्याच्या दरात मात्र फारशी वाढ झाली नाही. एक तोळा २२ कॅरेट सोन्यासाठी १ लाख ३१ हजार रुपये मोजावे लागत होते.

April 11, 2025 8:41 PM April 11, 2025 8:41 PM

views 13

सोनं, चांदी महागली !

देशात आज सोनं तोळ्यामागे सुमारे ३ हजार रुपयांनी महागलं. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर तोळ्यामागे ९५ हजारांच्या ८६२ रुपयांच्या पलीकडे पोहोचलं. २२ कॅरेट सोन्याचे दर ९३ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त होते. चांदीही किलोमागे सुमारे २ हजार रुपयांनी महाग होऊन ९५ हजार ४०० झाली.

April 7, 2025 8:41 PM April 7, 2025 8:41 PM

views 13

अमेरिकेनं जाहीर केलेल्या करकपातीमुळं सोनं, चांदीच्या दरातही मोठी घसरण

अमेरिकेनं जाहीर केलेल्या करकपातीमुळं सोनं, चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएनशननं दिलेल्या दरांनुसार सोनं सुमारे २ हजार रुपये तोळा आणि चांदी अडीच हजार रुपये किलोनं स्वस्त झाली. त्यामुळं २२ कॅरेट सोनं तोळ्यामागे ८९ हजार ५०० रुपये आणि चांदी किलोमागे ९३ हजार १०० रुपये दरानं मिळत होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं प्रति औंस ३ हजार २०१ डॉलरच्या उच्चांकी पातळीवरुन ३ हजार ६० डॉलर प्रति औंस पर्यंत घसरलं होतं.    कच्च तेल २ पूर्णांक २१ शतांश टक्क्यांनी घसरुन ६४ डॉलर २४ ...

October 23, 2024 7:39 PM October 23, 2024 7:39 PM

views 9

राज्यात सोनं-चांदीच्या दरात वाढ

राज्यात तोळ्यामागे सोन्याचे दर तोळ्यामागे ८० हजारांच्या पुढे गेले असून चांदी किलोमागे १ लाख रुपये झाली आहे. कालच्या तुलनेत सोनं-चांदी आज सुमारे ४००-५०० रुपयांनी महागलं. २४ कॅरेट सोनं जीएसटी शिवाय ७८ हजार ७०० रुपये तोळा आणि २२ कॅरेट सोन्याचे व्यवहार ७८ हजार ४०० रुपये दराने होत होते. चांदीचे व्यवहार ९८ हजार ८६२ रुपये किलो दरानं होत होते.    दिवाळी आणि लग्नसराईमुळं ही दरवाढ होते आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातले चढ-उतार, महागाईचे दबाव आणि जागतिक राजकीय तणाव यांसारख्या आर्थिक घटकांचाही सोन्य...