August 27, 2025 7:53 PM August 27, 2025 7:53 PM

views 10

आशियाई नेमबाजी स्पर्धेत अनीश भनवालाला रौप्यपदक

कझाकस्तान इथं सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाज अनीश भनवाला याचं सुवर्णपदक अवघ्या एका गुणानं हुकलं आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या सू लियाबोफान यानं ३६ गुणांसह सुवर्णपदक पटकावलं, तर दक्षिण कोरियाच्या स्पर्धकानं कांस्यपदक मिळवलं.   स्पर्धेच्या वरिष्ठ गटाच्या पदकतालिकेत चीन १५ सुवर्णपदकांसह २७ पदकं मिळवून पहिल्या स्थानावर आहे, तर ९ सुवर्णपदकांसह २३ पदकं मिळवून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

August 3, 2025 2:15 PM August 3, 2025 2:15 PM

views 7

१७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धात लैकीला रौप्यपदक

ग्रीसमध्ये सुरु असलेल्या, १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत, भारतीय कुस्तीगीर लैकी यानं पुरुषांच्या ११० किलो फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदक जिंकलं. दरम्यान, आणखी एक भारतीय कुस्तीगीर सिटेंडरनं पुरुषांच्या ६० किलो फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिटेंडरनं उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या बेकासिल असाम्बेकचा पराभव केला.   भारताच्या गौरव पुनियाला ६५ किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या कांस्य लढतीत इराणच्या मोर्तेझा मुल्ला मोहम्मदीकडून पराभव पत्करावा लागला.

October 21, 2024 2:41 PM October 21, 2024 2:41 PM

views 8

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीला महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक

मेक्सिको इथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या दीपिका कुमारी हिला आज महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या ली जियामन हिने सुवर्णपदक जिंकलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावण्याची दीपिकाची ही पाचवी वेळ आहे.

October 16, 2024 9:38 AM October 16, 2024 9:38 AM

views 21

आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या सोनम मसकरला रौप्य पदक

नवी दिल्ली इथं काल झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सोनम मसकर हिने 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. तिने 252 पूर्णांक 9 गुण मिळवले. या स्पर्धेत चीनच्या युतिंग हुआंगनं सुवर्ण, तर फ्रान्सच्या ओसियन मुलरनं कास्य पदक पटकावलं.

October 15, 2024 2:26 PM October 15, 2024 2:26 PM

views 5

भारताच्या सोनम उत्तम मस्करनं महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये पटकावलं रौप्य पदक

नवी दिल्ली इथं झालेल्या I S S F नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या सोनम म्हसकर हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात आज रौप्य पदक जिंकलं. बावीस वर्षांच्या सोनमने २५२ पूर्णांक ९ गुण मिळवत आपलं पदक निश्चित केलं. या स्पर्धेत चीनच्या युतिंग हुआंग हिने सुवर्ण तर फ्रान्सच्या ओसियन मुलर हिने कांस्य पदक पटकावलं.

September 5, 2024 9:41 AM September 5, 2024 9:41 AM

views 12

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सांगलीच्या सचिन खिलारीला गोळाफेक प्रकारात रौप्यपदक

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्णांसह चार पदकांची कमाई केली. तिरंदाजी मध्ये पुरुषांच्या रिकर्व ओपन स्पर्धेत हरविंदर सिंहने सुवर्ण पदक पटकावलं. पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला तीरंदाज ठरला आहे. पुरुषांच्या क्लब थ्रो एफ - 51 प्रकारात धर्मवीर याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याच स्पर्धेत प्रणव सुरमानं रौप्य पदक जिंकलं. गोळाफेक एफ 46 प्रकारात सचिन खिलारीनं रौप्यपदकाची कमाई केली. सचिन हा सांगली जिल्ह्यातल्या करगणी इथला रहिवासी आहे. त्याने १६ पूर्णांक ३२ मीटर अंत...