October 22, 2025 8:20 PM October 22, 2025 8:20 PM
57
खुशखबर! सोनं, चांदीच्या दरात घसरण
पाडव्याच्या मुहुर्तावर सर्वसामान्यांना दिलासा देत सोनं आणि चांदीच्या दरात आज मुंबईच्या बाजारपेठेत घसरण झाली. सोनं तोळ्या मागे पावणे ४ हजार रुपयांनी तर चांदी किलोमागे १० हजार रुपयांनी आज स्वस्त झाली. तरी ९२ कॅरेट सोन्यासाठी तोळ्यामागे सव्वा लाख रुपये आणि एक किलो चांदीसाठी १ लाख ५७ हजार रुपये मोजावे लागत होते.