June 1, 2025 1:56 PM June 1, 2025 1:56 PM

views 5

सिक्किममधे भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत

सिक्किममधे भूस्खलनामुळे मंगन जिल्हयात अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे लाचेन आणि लचुंग इथं जवळपास दीड हजार पर्यटक अडकून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. रस्त्यावरचा मलबा काढून रस्ते मोकळे करण्याचं काम सुरू आहे. काम पूर्ण होईपर्यंत पर्यटकांनी बाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. अतिवृष्टीमुळे मंगन जिल्ह्यात तिस्ता नदी दुधडी भरून वाहत आहे. दरम्यान, चुंगथांग इथं बेपत्ता झालेल्या ९ पर्यटकांचा शोध सुरू आहे.

April 25, 2025 1:33 PM April 25, 2025 1:33 PM

views 6

उत्तर सिक्कीममध्ये संततधार पावसामुळे भूस्खलन

उत्तर सिक्कीममध्ये संततधार पावसामुळे लाचेन चुंगथांग रस्त्यावर मुनशिथांग इथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आज उत्तर सिक्कीमसाठी पर्यटनाचे कोणतेही परवाने जारी केले जाणार नसून पूर्वी जारी केलेले परवानेही रद्द करण्यात आले आहेत.   गंगटोक ते चुंगथांग हा रस्ता सुरू असून लाचेन किंवा लाचुंग इथे प्रवास करणारे लोक गंगटोकपर्यंत परत येऊ शकतील. मुनशिथांग इथे रस्त्याच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मांगनचे जिल्हाधिकारी अनंत जैन यांनी दिली आहे.